E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारताच्या सामर्थ्यात होणार आणखी वाढ
Samruddhi Dhayagude
29 May 2025
ऑपरेशन सिंदूरपासून पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने पाचव्या पिढीतील अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या (एमका) निर्मिती प्रकल्पास नुकतीच मंजुरी दिली. स्वदेशी संरक्षण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने भारताने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
एमका म्हणजे काय?
अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एमका) हे भारताचे पाचव्या पिढीतील अत्याधुनिक मध्यम पल्ल्याचे विमान आहे. ते भारतीय हवाई दलासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वैमानिक विकास संस्थेद्वार विकसित केले जात आहे. हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. २०३० पर्यंत भारतीय हवाई दलाला जागतिक दर्जाचे स्वदेशी विमान उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे राफेल आणि सुखोई सारख्या आयात केलेल्या विमानांवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल.
वैशिष्ट्ये काय?
हे विमान सिंगल सीटर असून, त्यामध्ये डबल इंजिन आहे. त्याचा वेग ताशी २५०० किलोमीटर आहे. विमानाचे वजन २५ टन असून सलग दहा तास हवेत राहू शकते. रडारपासून बचाव करण्याची तसेच आफ्टरबर्नरशिवाय ध्वनीच्या वेगाने उड्डाण करण्याची क्षमता, प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रे यामुळे हे बहुभूमिका असलेले विमान असणार आहे. त्यामुळे ते हल्ला आणि बचाव दोन्ही करू शकेल.
भारतीय हवाई दलाच्या गरजेनुसार त्यामध्ये ११ प्रकारची शस्त्रे बसवता येतात. बहुतेक शस्त्रे विमानाच्या आतमध्ये असतात. या विमानाचे पहिले उड्डाण २०२८ मध्ये अपेक्षित आहे. सर्व चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या तर २०३४ मध्ये हे विमान भारतीय हवाई दलात सामील होऊ शकेल.
शत्रूसाठी अधिक घातक
या विमानात असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस, नेटसेंट्रिक वॉरफेअर सिस्टम, इंटिग्रेटेड व्हेइकल हेल्थ मॅनेजमेंट आणि इंटरनल-बे यांच्या ताकदीमुळे ते शत्रूसाठी अत्यंत घातक ठरेल. एआय-चालित इलेक्ट्रॉनिक पायलटमध्ये आजूबाजूच्या परिस्थितीचे सर्वसमावेशक दृश्य प्रदान करण्यासाठी मल्टी-सेन्सर डेटा फ्यूजन आहे. त्यामुळे वैमानिक त्वरित कारवाई करू शकतो आणि लक्ष्यावर अचूकपणे मारा करू शकतो.
खासगी कंपन्यांसोबत भागीदारी
पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या निर्मिती प्रकल्पात पहिल्यांदाच सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशाच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने यापूर्वीच या विमानांचे मॉडेल तयार केले आहे. त्यामुळे या सार्वजनिक किंवा खासगी कंपन्या एकट्याच किंवा संयुक्त उपक्रमात विमानांचे उत्पादन करू शकतात, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
कोणत्या देशांकडे आहेत पाचव्या पिढीतील विमाने?
अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच आतापर्यंत पाचव्या पिढीतील विमाने विकसित केली आहेत. यामध्ये अमेरिकेचे एफ-२२ रॅप्टर आणि एफ-३५ लाइटनिंग खख, चीनचे जे-२० मायटी ड्रॅगन आणि रशियाचे एसयू-५७ फेलॉन ही पाचव्या पिढीतील विमाने आहेत. अलीकडेच पाकिस्तानने पाचव्या पिढीतील जे-३५ विमानासाठी चीनसोबत करार केला होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर चीनने पाकिस्तानला लवकरच जे-३५ देण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.
Related
Articles
पीएमपी भाडेवाढीमुळे पुणेकरांच्या खिशावर दरोडा
06 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
पीएमपी भाडेवाढीमुळे पुणेकरांच्या खिशावर दरोडा
06 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
पीएमपी भाडेवाढीमुळे पुणेकरांच्या खिशावर दरोडा
06 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
पीएमपी भाडेवाढीमुळे पुणेकरांच्या खिशावर दरोडा
06 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?