गोव्यात परिचारिकेवर बलात्कार; मिरजेतील डॉक्टरला अटक   

मिरज : रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिकेवर बलात्कार  केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग उर्फ बॉबी अरवट्टगी यांना गोव्यातील कांकोलीम पोलिसांनी अटक केली. डॉ. अरवट्टीगी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ते गोव्यात कांकोलीम येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. एक महिन्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या खासगी रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या बहाण्याने निवासस्थानी नेले आणि बलात्कार केला, अशी तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने कांकोलिम पोलिसांत डॉ. आरवट्टगी याच्याविरुद्ध तक्रार दिली. 

Related Articles