आयपीएल जिंकणार्‍या संघावर बक्षिसांचा वर्षाव   

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना खेळला गेला.अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत आपल्या १८ वर्षांच्या वाटचालीला अखेर यशाची गोडी दिली. दरम्यान, विजेत्या आणि उपविजेत्या संघाला बक्षीस रूपात किती रक्कम मिळणार आहे. 
 
आयपीएल जिंकणारा संघ आणि उपविजेत्या संघाला २०२२ पासून समान रक्कम मिळते, असे म्हटले जाते. परंतु, याबाबात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बक्षीस रकमेत शेवटचा बदल तीन वर्षांपूर्वी करण्यात आला.त्यानुसार, विजेत्याला २० कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये मिळाले. तर, क्लालिफायर- २ मधून बाहेर पडलेल्या संघांना ७ कोटी आणि एलिमिनेटर सामन्यात पराभूत झालेल्या संघाला ६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले 
 
विजेता संघ- २० कोटी रुपये
उपविजेता संघ- १३.५ कोटी
क्लालिफायर २ पर्यंत पोहोचलेला संघ- ७ कोटी
एलिमिनेटर सामन्यात पराभूत झालेला संघ- ६.५ कोटी
 
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप, पर्पल  कॅप पुरस्कार जिंकणार्‍या खेळाडूंवरही पैशांचा वर्षाव झाला. ऑरेंज  कॅप आणि पर्पल  कॅप जिंकणार्‍या खेळाडूला प्रत्येकी १०-१० लाख रुपये मिळतात. तर, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन ठरलेल्या खेळाडूला २० कोटी रुपये दिले

Related Articles