E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वडगाव मावळमधील फार्म हाऊसवर हगवणे पिता-पुत्राचा मुक्काम
Wrutuja pandharpure
25 May 2025
पिंपरी
: वैष्णवी मृत्यू प्रकरणात पाच जणांना अटक झालेली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे आठवडाभर फरारी होते. अटक टाळण्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर आणि सातारापर्यंतचा प्रवास केला. सातारा जिल्ह्यातील पुसेगावात अमोल जाधव यांच्या शेतात ते काही वेळ थांबले होते. जाधव यांच्याकडे हगवणे यांचे शर्यतीचे बैल सांभाळायला असतात. तसेच, हगवणे पिता-पुत्र वडगाव मावळमध्ये एका फार्म हाऊसवरही मुक्कामाला होते हे समोर आले आहे.
यासंदर्भात अमोल जाधव म्हणाले, राजेंद्र हगवणे १९ तारखेला सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेतात आले होते. ते १५ मिनिटेच थांबले. त्यावेळी पाऊस सुरु होता. आम्ही आंबे उतरवत होतो. ते आमच्याशी काही बोलले नाहीत. पण, ते घाबरलेले दिसत होते. त्यांची आणि माझी चुलत भावामुळे ओळख आहे. राजेंद्र हगवणे इतके का घाबरले आहेत? ते आम्हाला त्यावेळी समजले नाही. दुसर्या दिवशी आम्हाला वैष्णवीबद्दल समजले आणि त्यांच्या घाबरण्यामागचे कारण समजले, असे त्यांनी सांगितले.
वडगाव मावळमधील चिरोली-चांदोली गावचे सरपंच बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर राजेंद्र हगवणे गेला होता, अशीदेखील माहिती समोर आली आहे. खुद्द या फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक यांनी ही माहिती दिली आहे. १० ते १८ मे या कालावधीत मी घरातच होतो. १३ मे रोजी माझ्या मुलाचे लग्न झाले. त्यानंतर सत्यनारायण पूजा होती. त्यादिवशी बंडोपंत भेगडे यांचा मला फोन आला. हगवणे यांना तुमच्याशी बोलायचे असल्याचे भेगडे म्हणाले. तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का? अशी विचारणा हगवणे यांनी माझ्याकडे केली. मी मुलाच्या लग्नात व्यग्र होतो. घरी पाहुणे मंडळी होती. त्यामुळे मला बाहेर चाललेल्या गोष्टींची कल्पना नव्हती. हगवणे यांनी केलेल्या कृत्याबद्दल मी अनभिज्ञ होतो. घरी पाहुणे असल्याने भेगडे, हगवणे यांच्याशी बोलता आले नाही. पोलिसांनी चौकशीला बोलावले तर मी जाईन, असे त्यांनी सांगितले.
Related
Articles
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
19 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
19 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
19 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
19 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त