E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तपासात कोणतीही त्रुटी राहू नये
Wrutuja pandharpure
24 May 2025
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
पिंपरी
: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे हिच्या माहेरी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. घटनेबाबत शोक व्यक्त केला.त्या म्हणाल्या की, या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना तत्काळ अटक न केल्याने कुणा उच्च पदस्थ व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे, वैष्णवीला नक्की न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पोलीस महिलांना 'भरोसा सेल'मध्ये बोलवतात परंतु महिला दक्षता समित्यांमध्ये त्यांच्या तक्रारींवर वेळेत उत्तर मिळत नाही. जर तक्रारी वेळेवर ऐकल्या गेल्या असत्या तर अनेक घटनांपासून बचाव होऊ शकला असता. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि कायदेशीर प्रक्रिया, बालकाच्या ताब्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार काय करणे गरजेचे आहे, यावरही चर्चा केली.
पोलिसांकडून सांगण्यात आले की,या प्रकरणात चार्जशीट दाखल झालेली असून साक्षीपुराव्यात कोणताही हस्तक्षेप शक्य नाही. मात्र पाच दिवस आरोपी बाहेर कसे राहू शकले यावर प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत केली, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. मयुरी जगताप या वैष्णवीच्या जावेची भेट घेऊन तिला देखिल न्याय मिळवून देणेबाबत डॉ गो-हे यांनी आश्वासित केले व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करणे बाबत संबंधित संरक्षण अधिकारी यांना सुचना दिल्या.अशा हुंडाबळीच्या शिकार झालेल्या या मुलींना न्याय मिळावा यासाठी समाज म्हणुन आपण सर्वजण निष्पक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे,असेही त्या म्हणाल्या. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सारिका पवार, कांता पांढरे, सुदर्शन त्रिगुणाईत, जिल्हाप्रमुख मनीषा परांडे, स्त्री आधार केंद्र पुणेच्या अनिता शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक
07 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
एकत्र येण्याबाबत दोन्ही बंधूंनी बोलले पाहिजे
06 Jun 2025
राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक
08 Jun 2025
शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी
08 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक
07 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
एकत्र येण्याबाबत दोन्ही बंधूंनी बोलले पाहिजे
06 Jun 2025
राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक
08 Jun 2025
शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी
08 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक
07 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
एकत्र येण्याबाबत दोन्ही बंधूंनी बोलले पाहिजे
06 Jun 2025
राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक
08 Jun 2025
शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी
08 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक
07 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
एकत्र येण्याबाबत दोन्ही बंधूंनी बोलले पाहिजे
06 Jun 2025
राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक
08 Jun 2025
शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी
08 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका