झारखंडमध्ये म्होरक्यासह दोन माओवादी ठार   

लाटेहर : झारखंडमध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर उडालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले आहेत. त्यामध्ये झारखंड जन मुक्ती परिषदेचा (जेजेएमपी) म्होरक्या पप्पू लोहरा याचा समावेश आहे. त्याला पकडून देणार्‍यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 
 
झारखंड जन मुक्ती परिषद ही माओवादी गटापासून विभक्त झालेली एक संघटना आहे. त्या संघटनेचा पप्पू लोहरा हा म्होरक्या होत्या.   केंद्रीय राखीव पोलिस दल आणि झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती. त्यात लाटेहार पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्होरक्या लोहरा आणि अन्य एक माओवादी ठार झाला.घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असल्याची माहिती पालमूचे पोलिस अधिकारी वाय. एस. रमेश यांनी दिली. चकमकीत ठार झालेल्या दुसर्‍या माओवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही अन्य एक माओवादी गोळीबारात जखमी झाला आहे. त्याच्याकडून इन्सान रायफल जप्त केली. लोहरा आणि त्याचे साथीदार जंगल परिसरात आल्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर लाटेहारचे पोलिस अधीक्षक कुार गौरव यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविली. माअवादी गटाने सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्याला प्रत्त्युत्तर दिले.
 

Related Articles