ऑनलाईन फसविणार्‍या गुन्हेगाराला अमेरिकेने भारताकडे सोपविले   

नवी दिल्ली : भारतीय नागरिक आणि अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना फसविणारा भारतीय वंशाचा गुन्हेगार अंगद सिंग चांधोक याला अमेरिकेने भारताकडे सोपविले आहे, अशी माहिती सीबीआयच्या अधिकार्‍यांनी शनिवारी दिली. 
 
आंतरराष्ट्रीय डिजीटल गैरव्यवहार करुन चांधोक याने अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना लाखो डॉलर्सना फसविले होते. या प्रकरणी २०२२ मध्ये अमेरिकेच्या न्यायलयाने त्याला दोषी ठरविले होते. त्याला सहा वर्षांची शिक्षा देखील ठोठावली होती. त्याने अनेक भारतीयांना अशाच पद्धतीने फसविले असल्यामुळे तो भारताला हवा होता. भारतातून पळून गेल्यानंतर त्याने अमेरिकेत आश्रय घेतला होता. या काळात त्याने देश आणि परदेशात पैसे पाठवण्याचे जाळे निर्माण केले होते. या जाळ्यात अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिक  सापडले. त्यांच्या आयुष्याची पूंजी त्याने ऑनलाइन डिजीटल सेवा योजना आणि नंतर ऑनलाइन प्रवास शुल्क योजनेत हडप केली होती. ती रक्कम लाखो डॉलर्सच्या घरात आहे. चांधोक आणि अन्य पाच जण गैरव्यवहारात सहभागी आहेत. त्यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर अनेकांना या योजनेचे सदस्यत्व दिले होते. 

Related Articles