कोरोना रुग्णसंख्या पाच हजारच्या घरात   

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे. देशात सध्या ४ हजार ८६६ रुग्ण असून केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे.देशात सर्वाधिक १,४८७ रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. त्यापाठोपाठ, ५३८ कोरोना रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे. महाराष्ट्रात ५२६ कोरोना रुग्ण असून आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये ७६ वर्षांच्या दोन तर ७९ वर्षांच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये ८७ वर्षांच्या वृद्धाचा आणि पाच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. कर्नाटकातही ६५ आणि ४२ वर्षांच्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.गुजरातमध्ये ५०८, पश्चिम बंगालमध्येे ५३८, तमिळनाडूत २१३, उत्तर प्रदेशात १९८, राजस्तानमध्ये १०३ रुग्ण आढळून आले आहेत. मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागाप्रदेश आणि त्रिपुरा वगळता अन्य राज्यांतही काही प्रमाणात रुग्ण आढळले आहेत.

Related Articles