’हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे शनिवारी आयोजन   

 पुणे : ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’, ‘दैनिक केसरी’ व ’हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि’ यांच्या संयुक्त विद्यमाने खास पुणेकरांसाठी ’हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे २४ मे रोजी आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकुल सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होईल. 
 
हा उपक्रम नि:शुल्क असून बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या सहकार्याने चालवण्यात येतो. सध्याच्या पावसाळी हवामानाचा विचार करून या महिन्यातील ’हेरिटेज वॉक’ हा वारसा विषयक व्याख्यानामध्ये रूपांतरित करण्यात येत आहे. या उपक्रमात ’भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा’ या विषयावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व भारतीय विद्या अध्ययन केंद्रातील प्रा. डॉ. अंबरीष खरे हे व्याख्यान देतील. तसेच, यामध्ये १४ विद्या, ६४ कला, साहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान, कला आणि स्थापत्य, गणित, योग, आयुर्वेद, कृषी यांसारखे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विद्याशाखा आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
 

Related Articles