E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बावधनमध्ये राडारोड्यामुळे वाहतूक कोंडी
Samruddhi Dhayagude
22 May 2025
तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मनसेची मागणी
पुणे : बावधन येथील डॉ. होमी भाभा रस्ता (एनडीए-पाषाण रोड) वरील जुन्या बावधन पोलीस स्थानकसमोर असलेला गतिरोधक महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकला. मात्र, काढलेला राडारोडा रस्त्यावरच टाकून दिला. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. जेसीबीने रस्ता खरडल्यामुळे रस्ता घसरडा झाला असून, तेथे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात राडारोड्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. परिणामी, स्थानिक रहिवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात तक्रारी केल्या.
या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने बुधवारी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, २४ तासांच्या आत राडारोडा हटवून रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडले जाईल आणि त्यामुळे होणार्या नुकसानीस महापालिकेला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष गणेश साळी, संजय तोडमल, प्रभाग सचिव संदीप काळे, शाखाध्यक्ष अशोक मराठे, शाखाउपाध्यक्ष विजय ढाकणे, तसेच प्रेमनाथ उमाप, विजय बोरकर, राजेंद्र फुके, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Related
Articles
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
अशोक लेलँड : बोनस व लाभांशाचे संकेत गुंतवणुकीस अनुकूल
02 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना पालिकेत प्रवेश बंदी
07 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?