E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
ट्रम्प यांच्या नाकावर टिचून फॉक्सकॉनची भारतात १२ हजार ८०० कोटींची गुंतवणूक
Samruddhi Dhayagude
21 May 2025
अॅपल कंपनीसाठी आयफोन उत्पादित करणारी कंपनी फॉक्सकॉन त्यांच्या भारतातील युनिटमध्ये तब्बल १.४८ अब्ज डॉलर्सची (जवळपास १२,८०० कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. फॉक्सकॉनच्या सिंगापूरस्थित युनिटने तमिळनाडूमधील युजान टेक्नोलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या फॉक्सकॉनच्याच युनिटमध्ये ही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये (शेअर बाजाराला दिलेली माहिती) याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
अॅपलला भारतातील आयफोनची निर्मिती वाढवायची असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीला चीनवरील अवलंबित्त्व कमी करायचे आहे. त्यासाठी कंपनी भारत व व्हिएतनामसारख्या देशातील त्यांच्या युनिटवर अधिक लक्ष देत आहे. याच योजनेचा भाग म्हणून कंपनीने आता भारतात तब्बल १२,८०० कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेत भारतातील आयफोन्सची चर्चा
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कूक यांनी घोषणा केली आहे की, “अॅपल कंपनी जूनच्या तिमाहित अमेरिकन बाजारात भारतात तयार केलेले फोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे”. म्हणजेच अमेरिकन बाजारात भारतीय बनावटीच्या आयफोन्सचे सर्वाधिक प्रमाण दिसेल. तर, चीनमध्ये तयार केलेले आयफोन इतर देशांमधील बाजारपेठांमध्ये उपलब्ध केले जातील. हळूहळू चीनमधील उत्पादन कमी करून भारतात उत्पादन वाढवणे हे अॅपलचे उद्दीष्ट आहे. फॉक्सकॉन कंपनी, टाटा इलेक्ट्रॉनिक्स व पेगाट्रॉन इंडिया (टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकीची आणखी एक कंपनी) या कंपन्या भारतात आयफोनच्या निर्मितीत उतरल्या आहेत.
ट्रम्प यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आयफोनच्या भारतातील उत्पादनाला विरोध आहे. अलीकडेच त्यांनी अॅपल कंपनीला भारतात आयफोन न बनवण्याचे आवाहन केले होते. ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले आहे की, भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या. तुम्ही अमेरिकेत उत्पादन करण्यावर भर द्या.
ट्रम्प म्हणाले, “मी अलीकडेच टिम कूक यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांना म्हटले की, आम्ही (अमेरिकेचं सरकार) तुमच्याशी खूप चांगले वागतोय. पण मी ऐकले की, तुम्ही भारतात कारखाने उभारताय. तुम्हाला भारताला मदत करायची असेल तर ते ठीक आहे, पण भारत हा आपल्याकडून सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. त्यापेक्षा तुम्ही अमेरिकेत उत्पादन करण्याकडे लक्ष द्यावे.”
Related
Articles
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
इंग्लंडमध्ये विजय मिळविणे अत्यंत अवघड : गौतम गंभीर
07 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?