E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ज्योती मल्होत्राचे इन्स्टाग्राम खाते बंद
Samruddhi Dhayagude
19 May 2025
नवी दिल्ली : हरियाणातील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिचे इन्स्टाग्राम खाते बंद केले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास १ लाख ३३ हजार फॉलोअर्स होते. पाकिस्तानसाठी तिने हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप असल्याने तिच्यावर ही कारवाई केली.
‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे तिचे युट्यूब चॅनेल आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी ती पाकिस्तानला गेली होती. तिची ही ट्रीप स्पॉन्सर्ड करण्यात आली होती, असे ही पोलिसांना चौकशीतून समजले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन 'सिंदूर'दरम्यान ज्योती पाकिस्तानच्या संपर्कात होती. परंतु,भारतीय संरक्षणासंबंधातील कोणतीही गुप्तचर माहिती तिच्याकडे नव्हती. पाकिस्तानी एजंटने पाकिस्तानचे चित्र सकारात्मक बनवण्यासाठी तिचा वापर केला होता.
मूळची हरियाणाच्या हिसारची असणारी ज्योती मल्होत्राला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. भारताबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ज्योतीवर असून तिची कसून चौकशी केली जात आहे. ज्योती या पूर्वी पाकिस्तानलादेखील जाऊन आली असून भारतातील पाकिस्तानी दूतावासातही तिचा चांगला संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्योतीनेच गेल्या वर्षी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाकडून इफ्तार पार्टीचे विशेष आमंत्रण आल्याचे आपल्याच व्हिडीओमध्ये नमूद केले होते.
ज्योती मल्होत्राने या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दूतावासातील तत्कालीन अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याने आपल्याला या पार्टीसाठी विशेष आमंत्रित केल्याचे ही म्हटले आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये दानिशच ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील उच्चपदस्थांशी ओळख करून देत असल्याचे ही दिसत आहे.
दानिशची हकालपट्टी
अवघ्या आठवड्याभरापू्र्वीच भारत सरकारने दानिशची हेरगिरीच्या आरोपावरून भारतातून हकालपट्टी केली होती. दानिश व ज्योती एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते, अशी माहितीही प्राथमिक तपासातून समोर येते.
Related
Articles
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश पूर्व परीक्षा मंगळवारपासून
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?