E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दोन देशांत अचानक कोविडचे रुग्ण वाढले
Samruddhi Dhayagude
16 May 2025
हॉंगकॉंग : संपूर्ण जगात २०२० मध्ये कोविड-१९ या रोगाची साथ आलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा आशिया खंडात कोरोनाच्या लाटेची भिती व्यक्त होत आहे. याचे कारण म्हणजे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना पुन्हा पसरत असल्याचे दिसत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून कोरोनाच्या रुग्णामध्ये अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली.
या पार्श्वभूमीवर हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचा इशारा दिला. या संदर्भातील वृत्त 'ब्लूमबर्ग'च्या हवाल्याने 'हिंदुस्तान टाईम्स'ने दिले. या वृत्तानुसार, हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली आहे.
हाँगकाँगच्या 'सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या कम्युनिकेबल डिसीज ब्रँच'चे प्रमुख अल्बर्ट औ यांनी या आठवड्यात स्थानिक माध्यमांशी बोलताना विषाणूचा वेग जास्त असल्याचे म्हटले. तसेच हाँगकाँगमध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांची संख्या वाढली असल्याचे वृत्तात नमूद केले आहे. आकडेवारीनुसार, ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात कोविडमुळे झालेल्या मृत्यूंसह गंभीर प्रकरणे ३१ वर पोहोचले आहेत. ही आकडेवारी गेल्या वर्षभरातील सर्वोच्च आहे.
सिंगापूरमध्येही कोविड अलर्ट
हाँगकाँगमधील कोविडच्या रुग्णांची संख्या एवढी जास्त नसली तरी हा विषाणू वेगाने पसरत असल्याचे समोर येत आहे. सिंगापूरमध्येही कोविड अलर्ट दिला आहे. त्यांनी जवळजवळ एका वर्षात कोविडच्या रुग्णांची आकडेवारीची माहिती दिली. त्यामध्ये चिंताजनक संख्या समोर आली. ३ मे रोजीच्या आठवड्यात अंदाजे कोविड प्रकरणांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८ टक्के वाढली आहेत.
सिंगापूर आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ ही लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट झाल्यामुळे होऊ शकते. मात्र, सध्याचे प्रकार साथीच्या काळात दिसलेल्या प्रकारांपेक्षा जास्त गंभीर किंवा पसरणारे असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आशिया खंडातील दोन सर्वात महत्वाच्या देशात हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने लोकांना विशेषतः जास्त धोका असलेल्यांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Related
Articles
बंगळुरुला फक्त १४ कोटी रुपये मिळणार
05 Jun 2025
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
सोमवारपासून रंगणार ‘ग्लोबल पुलोत्सव’
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
बंगळुरुला फक्त १४ कोटी रुपये मिळणार
05 Jun 2025
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
सोमवारपासून रंगणार ‘ग्लोबल पुलोत्सव’
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
बंगळुरुला फक्त १४ कोटी रुपये मिळणार
05 Jun 2025
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
सोमवारपासून रंगणार ‘ग्लोबल पुलोत्सव’
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
बंगळुरुला फक्त १४ कोटी रुपये मिळणार
05 Jun 2025
महापालिका निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू
07 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
सोमवारपासून रंगणार ‘ग्लोबल पुलोत्सव’
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?