E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लाइफस्टाइल
पाकिस्तानला पाठिंबा देणार्या तुर्की, अझरबैजान देशांकडे पर्यटकांची पाठ
Samruddhi Dhayagude
15 May 2025
६० टक्के आरक्षण रद्द; ’हॅशटॅक बॉयकॉट तुर्की’,’हॅशटॅक बॉयकॉट अझरबैजान’ट्रेन्ड सुरू
मुंबई : भारत-पाकिस्तानच्या तणावावेळी पाकिस्तानला खुला पाठिंबा देणे तुर्की आणि अझरबैजानला भोवण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशात जाणार्या ६० टक्के भारतीय पर्यटकांनी आपले आरक्षण रद्द केली आहेत. तर दुसरीकडे मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये तुर्की आणि अझरबैजानमधून येणार्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. समाज माध्यमावरही ’#boycott turkey आणि #boycott azerbaijan’ हे ट्रेंडिंग आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की आणि अझरबैजानवर भारतीय पर्यटकांकडून बहिष्कार टाकण्यात येत आहे. तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारतीय नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होताना दिसत आहे. या असंतोषाचा परिणाम, भारतीय पर्यटकांनी या दोन्ही देशांमध्ये जाणे टाळायला सुरुवात केली. पाकिस्तानचे समर्थन करणार्या तुर्की आणि अजरबैजानला जाणार्या ६० टक्के पर्यटकांनी आपले नियोजित आरक्षण रद्द केल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजेंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिली. स्वदेशी जागरण मंच या संघटनेने देखील या दोन्ही देशांबद्दल आर्थिक प्रतिबंध आणि पर्यटन बहिष्काराचे आवाहन केले आहे.
पर्यटन उद्योगावर परिणाम
मेक माय ट्रीप, इझी माय ट्रीप, कॉक्स अॅण्ड किंग, ट्रायव्होमिंट आणि 'पिक युअर ट्रेल' यांसारख्या प्रमुख भारतीय पर्यटन कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानसाठीचे सर्व आरक्षण स्थगित केल्या आहेत. या कंपन्यांनी सुरक्षा, राजनैतिक संवेदनशीलता आणि राष्ट्रीय हित यांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी समाज माध्यमावर तुर्की आणि अझरबैजानला पर्यटन बहिष्कार करण्याचे आवाहन केले. त्यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून हा मुद्दा अगदी परखडपाने मांडला. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात,'' भारतीय पर्यटकांनी या दोन्ही देशांमध्ये गेल्या वर्षी चार हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.''
तुर्कीला किती पर्यंटकांनी भेट दिली?
२०२३ मध्ये दोन लाख ७४ हजार भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली. २०२२ च्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली होती.
अझरबैजानला किती पर्यटकांनी भेट दिली?
२०२३ मध्ये एक लाख १७ हजार ३०२ भारतीय पर्यटकांनी अझरबैजानला भेट दिली. २०२२ च्या तुलनेत त्यामध्ये ९३ टक्क्यांनी यात वाढ झाली होती. भारतीय पर्यटकांचा तुर्की आणि अझरबैजानमधील पर्यटन उद्योगावर मोठा प्रभाव आहे. या दोन्ही देशांनी पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारतीय नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. भारतीय नागरिकांच्या या बहिष्कारास्त्रामुळे या देशांच्या पर्यटन महसूलात घट होऊ शकते.
Related
Articles
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी