पगार जास्त म्हणून पोटगी मागणे अयोग्य   

पुणे : पतीला पगार जास्त असल्याने ५० हजार रुपयांची पोटगी मागणार्‍या पत्नीची मागणी कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली. पती हा मुलगी आणि आईचा सांभाळ करत आहे. पत्नीला चांगला पगार आहे. त्यातून ती स्वतःचा व्यवस्थित सांभाळ करू शकते. केवळ पतीला पगार जास्त आहे, म्हणून पोटगी मागणे योग्य नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी हा आदेश दिला.
 
संकेत आणि काजल (दोघांची नावे बदलली आहेत) अशी त्यांची नावे आहेत. १५ वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला. दोघांना १० वर्षांची मुलगी आहे. पती हा मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. त्याला दरमहा लाख रुपये पगार आहे. तर, पत्नी ही सरकारी नोकरी करते. तिलाही पगार चांगला आहे. मात्र, कालांतराने दोघांचे पटेनासे झाले. त्यामुळे पतीने वकील शीतल भट्टड यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नोटीस मिळाल्यानंतर पत्नी न्यायालयात हजर झाली. तिने दरमहा ५० हजार रुपये पोटगीची मागणी केली. पत्नीला मिळणार्‍या पगारातून दरमहा गृहकर्जाचा मोठा हप्ता जातो. पोलिस सोसायटीतून घेतलेल्या कर्जाचा हप्ताही भरावा लागतो. त्यामुळे तिला जरी पगार असला, तरी शिल्लक पगारावर तिला व मुलीचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यास वकील भट्टड यांनी युक्तिवादातून विरोध केला.

Related Articles