E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे विभागाचा ९४.८१ टक्के निकाल; विभागात पुणे जिल्हा अव्वल
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९४.८१ टक्के लागला आहे. विभागात पुणे जिल्ह्याने बाजी मारली असून निकालाची टक्केवारी ९७.२६ इतकी आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के लागला. विभागनिहाय निकालात पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विभागाच्या निकालात अर्ध्या टक्क्याने घट झाली आहे.
पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी निकालाची माहिती दिली. पुणे विभागात २ लाख ६४ हजार ७३६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ६३ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ५०७ इतकी असून निकालाची टक्केवारी ९४.८१ इतकी आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६१.५० टक्के इतका लागला.
यंदा विभागातून ९ हजार ७६० पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ९ हजार ५६५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५ हजार ८८३ इतकी आहे.जिल्हानिहाय निकालात पुणे जिल्ह्यातून १ लाख ३२ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३२ हजार ४४७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. तर १ लाख २८ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अहमदनगर जिल्ह्यातून ६७ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ६६ हजार ८५८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. तर ६१ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सोलापूर जिल्ह्यातून ६४ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ६३ हजार ८४९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. तर ५९ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
पुणे जिल्ह्यात ६६ हजार ५५९ मुले उत्तीर्ण झाली असून निकालाची टक्केवारी ९६.३८ इतकी आहे. तर ६२ हजार २५९ मुली उत्तीर्ण झाल्या असून निकालाची टक्केवारी ९८.२१ टक्के आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३३ हजार १६ मुले उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.२८ इतकी आहे. तर २८ हजार ३९५ मुली उत्तीर्ण झाल्या असून निकालाची टक्केवारी ९५.०३ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात ३१ हजार ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९०.०४ इतकी आहे. तर २८ हजार २७२ मुली उत्तीर्ण झाल्या असून निकालाची टक्केवारी ९६.१० इतकी आहे.
पुणे विभागात गैरप्रकरणात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घट झाल्याचे स्पष्ट झाले. यंदा एकूण ४३ गैरप्रकारांची नोंद झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यात १०, अहिल्यानगर जिल्ह्यात १६ आणि सोलापूर जिल्ह्यात १७ गैरप्रकार झाले. मागील वर्षी १०४ गैरप्रकाराची नोंद झाली होती. यामध्ये पुणे जिल्ह्यात १२, अहिल्यानगर जिल्ह्यात ५७ आणि सोलापूर जिल्ह्यात ३५ गैरप्रकार नोंदविण्यात आले.
Related
Articles
पती आणि सासू येरवडा कारागृहात
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
पती आणि सासू येरवडा कारागृहात
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
पती आणि सासू येरवडा कारागृहात
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
पती आणि सासू येरवडा कारागृहात
30 May 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी