भारत-पाक तणाव निवळणार   

वॉशिंग्टन डीसी : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला संघर्ष संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावा केला आहे. दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचं ट्रम्प यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन केले. 
 
भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न राष्ट्रे आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास त्याचे परिणाम जगावर होऊ शकतात. त्यामुळेच अमेरिकेने यामध्ये मध्यस्थी केली. याबद्दल ट्रम्प यांनी एक पोस्ट केली आहे. 'अमेरिकेने शुक्रवारी रात्रभर मध्यस्थीसाठी बोलणी केली. त्यात भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झाले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो,' अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.
 
प्रदिर्घ वेळ झालेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी आणि युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची माहिती देताना केलेल्या पोस्टची वेळ अतिशय महत्त्वाची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाचे परिणाम जागतिक पातळीवर दिसले आहेत.

Related Articles