E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव
Wrutuja pandharpure
23 May 2025
बेल्हे
, (प्रतिनिधी) : उन्हाळी हंगामात संकरित टोमॅटोवर अतिउष्ण हवामान, ढगाळ वातावरण व नुकताच झालेला मुसळधार पाऊसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. टोमॅटो पिकावर मोठ्या प्रमाणात टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.रोगाबरोबरच करपा, मररोग या बुरशीजन्य व जीवाणूजन्य, ग्राउंड बड नक्रोसिस व्हायरस, टोमॅटो मोजाक व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहरे यांनी सांगितले.
बुरशी, जिवाणू व विषाणूजन्य रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटोचा उन्हाळी हंगाम धोक्यात आला आहे. मागील पाच महिन्यापासून टोमॅटोला बाजारभाव नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकर्यांना आता कीड व रोगाच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे. यामुळे यावर्षी टोमॅटो उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात वाढलेल्या तापमानापासून टोमॅटो बागेचा बचाव करण्यासाठी यावर्षी काही शेतकर्यांनी प्रथमच पांढर्या रंगाच्या कापडाचे आच्छादन घातले आहे. एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च करून देखील रोग व कीड मुक्त टोमॅटोचे उत्पादन घेण्यात शेतकर्यांना अपयश आले आहे. टोमॅटोचा तोडणी हंगाम एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान सुरू राहतो. टोमॅटो हे पीक अतिशय संवेदनशील आहे. २० अंश सेल्सिअस तापमानाला टोमॅटो पीक चांगले येते.
मागील पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण असून ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे. याचा एकूणच परिणाम टोमॅटो या नगदी पिकावर होऊन विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे तोडणी हंगाम सुरू झालेल्या टोमॅटोच्या उत्पादनात ७० ते ८० टक्के घट झाली असून तोडणी सुरू होण्याच्या अवस्थेत असलेल्या बागाही करपल्या आहेत.
Related
Articles
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला