E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खराडीतील बनावट कॉल सेंटरवर छापा
Wrutuja pandharpure
25 May 2025
पाच जणांना अटक
पुणे
: खराडी येथील प्राईड आयकॉन या इमारतीच्या नवव्या मजल्यावर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी कॉल सेंटरमध्ये १११ पुरूष आणि १२ महिला असे एकूण १२३ जण काम करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. अमेरिकेतील नागरिकांना इंटरनेटवरून संपर्क साधून त्यांना डिजिटल अॅरेस्ट तसेच विविध प्रकारची भिती दाखवून फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, अनेक डिजीटल साहित्य जप्त केले आहे.
सरजितसिंग गिरावत सिंग शेखावत (खराडी, मुळ रा. झुंझुना, राजस्तान), अभिषेक अजयकुमार पांडे, श्रीमय परेश शहा, लक्ष्मण अमरसिंग शेखावत, अॅरोन अरुमन खिश्चन (चौघे मूळ रा. अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य सुत्रधार करणसिंग शेखावत, संजय मोरे आणि केतन रवानी हे तिघे फरारी आहेत. पोलिसांनी या बनावट कॉल सेंटरमधून १३ लाख ७४ हजारांचे ६४ लॅपटॉप, ४१ मोबाइल, ४ राऊटर, कॉल सेंटरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांची ओळखपत्रे, अमेरिकन नागरिकांना फसवणूक करण्यासाठी कर्मचार्यांना दिलेली इंग्रजीमधील संवाद लिहिलेली कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त केला.
खराडीत मागील वर्षी सुरू झालेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, सायबर पोलिस आणि गुन्हे शाखेने खराडी येथे बनावट कॉल सेंटरवर कामकाज सुरू असताना रात्री छापा घातला. यावेळी, जवळपास ३० पोलिस अधिकारी आणि दीडशे पोलिस अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी छापा घातला असता, कॉल सेंटरमध्ये १२३ जण काम करत होते. त्यांना जागेवरच थांबण्यास सांगून पोलिसांनी त्यांच्या लॅपटॉपची पाहणी केली असता कॉलसेंटरमधील हे आरोपी व कर्मचारी हे लॅपटॉपमध्ये अनेक संशयास्पद अॅप्लिकेशनचा, व्हिपीएन सॉफ्टवेअरचा वापर करुन कॉलर माईकद्वारे अमेरिकन नागरिकांना त्यांचे मोबाईलवर संपर्क करत होते. आरोपींनी काम करणार्या प्रत्येकाला एक लाख अमेरिकन नागरिकांची माहिती दिली होती. त्याद्वारे आरोपी त्यांच्यासोबत संपर्क साधून भिती दाखवायचे.
आतापर्यंत ७० कोटींची फसवणूक
कॉलसेंटरच्या माध्यमातून आरोपींनी मागील दहा महिन्यांत ७० कोटींची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. आरोपी हे दररोर ३० ते ४० हजार डॉलरची फसवणूक करत असल्याचे आतापर्यंत झालेल्या तपासात समोर आले आहे. आरोपी हे अमेरिकन नागरिकांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फसवून त्यांना डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवत होते. त्यांच्याकडून भेटवस्तूचे कार्ड, आभासी चलन याद्वारे खंडणी घेऊन ती हवालाद्वारे वटवत असल्याचे समोर आले आहे.
Related
Articles
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
मालिका विजेत्या कर्णधाराला मिळणार ’पतौडी मेडल’
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
मालिका विजेत्या कर्णधाराला मिळणार ’पतौडी मेडल’
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
मालिका विजेत्या कर्णधाराला मिळणार ’पतौडी मेडल’
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
मालिका विजेत्या कर्णधाराला मिळणार ’पतौडी मेडल’
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख