E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
२४२ पैकी केवळ एक जण बचावला; मृतांमध्ये माजी मुख्यमंत्री रुपाणी
अहमदाबादमध्ये कोसळले विमान
प्रवाशांमध्ये १६९ भारतीयांसह ६१ परदेशी नागरिक
अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे २३० प्रवासी आणि १२ कर्मचार्यांसह जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच रहिवासी भागात कोसळले. या दुर्घटनेत केवळ विश्वास रमेश हे प्रवासी बचावले आहेत. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असून टाटा समूहाने विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
कोणालाही वाचवण्याची शक्यता नव्हती : शहा
विमानात १.२५ लाख लीटर इंधन होते. अपघातानंतर मोठा भडका उडाला. त्यामुळे कोणालाही वाचवणे अशक्य होते, असे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना प्रकट करतो. डीएनए चाचणी आणि मृतांची ओळख पटल्यानंतरच अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल, असेही शहा म्हणाले. विमानात २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. अपघातातून वाचलेल्या एका व्यक्तीची मी भेट घेतली, असेही शहा म्हणाले.
मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी
मात्र, मृतांच्या संख्येबाबत मौन...
अपघातग्रस्त विमानात किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचण्या केल्या जातील, असे गुजरातच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. पण, मृतांची संख्या सांगण्यास नकार दिला.
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १:३९ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच एअर इंडियाचे लंडनकडे निघालेले विमान कोसळले. सुरुवातीला मोठा आवाज आला. त्यानंतर आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळाले.
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी अहमदाबाद शासकीय रुग्णालयाने डीएनए नमुने गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. मृतांचे नातेवाईक अहमदाबाद शासकीय रुग्णालयाच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कासोती भवनमध्ये डीएनए नमुने देऊ शकतील, असे राज्य आरोग्य विभागाचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले. पण, अपघातातील मृतांची संख्या सांगण्यास त्यांनी नकार दिला.
बीजे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या डॉक्टरांच्या निवासी इमारतीवर विमान कोसळले. यामध्ये अनेक जण जखमी झाले, असेही ते म्हणाले. सध्या पन्नास जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असेही द्विवेदी म्हणाले.
डॉक्टरांच्या निवासी इमारतीवर कोसळले विमान
लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही क्षणातच मेघानीनगर परिसरातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर कोसळले. यामध्ये परिसरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात निवासस्थानातील अनेक जण जखमी झाले असे सांगितले जाते. पण, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या निवासी इमारतीवर विमान कोसळले, असे प्रत्यक्षदर्शी हरेश शहा यांनी सांगितले. ही इमारत पाच मजली होती. इमारतीत अनेक जण राहत होते. यात अनेक जण जखमी झाले. विमान कोसळताच इमारतीला मोठी आग लागली, असेही ते म्हणाले.
एनडीआरएफची सहा, बीएसएफची दोन पथके
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर बचाव आणि मदत कार्यासाठी अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची सहा आणि सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) दोन पथके तातडीने पाठविण्यात आली, असे अधिकार्यांनी सांगितले. यापैकी, एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली असून चार पथके मार्गावर आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, सीमा सुरक्षा दलाची दोन पथकेदेखील अपघातस्थळी दाखल झाली आहेत. विमानतळाला दहशतवादविरोधी सुरक्षा कवच प्रदान करणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी स्थानिक अग्निशमन दल आणि पोलिस अधिकार्यांसह अपघातस्थळी तातडीने दाखल झाले, असेही अधिकार्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही प्रवाशांमध्ये समावेश
अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. रुपाणी हे एअर इंडियाच्या विमानाने लंडनला जात होते, असे भाजपचे वरिष्ठ नेते भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी सांगितले. मी त्यांची विचारपूस करण्यासाठी शासकीय रुग्णालयात जात आहे, असे चुडासामा यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, या विमानाने प्रवास करणार्या प्रवाशांच्या नावांची यादी समोर आली असून त्यामध्ये विजय रुपाणी हे नाव आहे.
विमान कोसळतानाचे दृश्य कॅमेर्यात कैद
काळजाचा थरकाप उडविणार्या विमान अपघाताचे दृश्य कॅमेर्यात कैद झाले आहे. यात उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणांत ६२५ फूट उंचीवरुन विमान वेगाने खाली येत असताना दिसत आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर फिरत आहे. विमान कोसळताच पेट घेते आणि त्यानंतर, कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत धूराचे लोट दिसू लागतात. विमान कोसळताच मोठा आवाज होतो. या आवाजाने हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर येतात आणि ते घटनास्थळाकडे धाव घेतात. घटनास्थळावरील चित्र पाहून सारेच हेलावतात. त्यानंतर, काही क्षणातच पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांचा सायरन ऐकू येऊ लागतो. या मार्गाकडे येणारे रस्ते तातडीने वाहतूक पोलिस बंद करतात.
पंतप्रधानांनी घेतला घटनेचा आढावा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. तसेच, घटनेचा आढावा घेतला. यासोबतच, त्यांना अहमदाबादला जाऊन दुर्घटनेत बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.
या संदर्भात एका अधिकार्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी स्वतः नायडू यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आणि अपघाताच्या घटनेचा आढावा घोतला. यासोबतच, तातडीने घटनास्थळाकडे रवाना होण्याचे आणि युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्याचे आदेश दिले.
तसेच, परिस्थितीबाबत नियमित माहिती देण्यास सांगितले. या घटनेनंतर देशातील सर्व विमानतळांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, आवश्यक खबरदारीची सूचना करण्यात आली आहे. मोदी यांनी गृहमंत्री शहा यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. नायडू आणि शहा यांना तातडीने अहमदाबाला जाण्यास सांगितले आहे.
विमान वाहतूक तात्पुरती थांबवली
अहमदाबाद : लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघातानंतर येथील येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. तसेच, विमानतळावर तात्पुरत्या स्वरुपात कोणत्याही विमानास उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत, असे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी प्रवाशांनी सद्यस्थितीची माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा आणि सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Related
Articles
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक