E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
रुपेरी पडदा : कल्पना खरे
काळी जादू, भूत बाधा, करणी, भानामती या सर्वच गोष्टी अनाकलनीय आहेत. विशेषतः कोकणात याचे अनुभव आल्याचे बरेच जण सांगतात. बालपणी मनात खोलवर रूजलेल्या काही घटना काही वर्षानंतर मोठेपणीही डोके वर काढू शकतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार उपयुक्त ठरतात. अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र यांच्या दरम्यान असलेली विचित्र भावनिक गुंतागुंत सध्या प्रदर्शित होत असलेल्या ‘जारण’ चित्रपटात पाहायला मिळत आहे.
राधा (अमृता सुभाष) आणि तिची मुलगी सई (अवनी जोशी) एका प्रशस्त घरात राहात असतात. राधाचा नवरा शेखर (विक्रम गायकवाड) कामानिमित्ताने परदेशी गेलेला असतो. राधाच्या माहेरचा कोकणातला वाडा पाडून मोठे रिसॉर्ट होणार असल्याने तिथे सर्व नातेवाईक ‘गेट टुगेदर’ करायचे ठरवतात. बाबा (राजन भिसे), आई (सीमा देशमुख) आणि इतरही कुटुंबीय एकत्र मौज मजा करत असतानाच काही विचित्र घटना घडत जातात. त्यातून राधाचा पूर्वेतिहास उलगडत जातो. लहानपणी त्याच घरात राहणार्या गंगुटी (अनिता दाते)च्या जारण-मारण काळी जादू याच्या हकीकती मानसोपचार तज्ज्ञ (किशोर कदम) समुपदेशक (ज्योती मालशे) यांच्या संभाषणातून समोर येतात. राधाच्या विचित्र वागण्याचे रहस्य जाणण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
अमृता सुभाषचे दीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर आगमन झाले आहे. राधाच्या भूमिकेतील तिचा अभिनय अप्रतिम झाला आहे. तिला होणारे भास, तिची भीती, या सर्व गोष्टी तिच्या मुद्राभिनयातून व्यक्त होतात. विशेषतः डोळे मिचकावणे किंवा गळा-मानेच्या शिरा हलवणे यासाठी तिने विशेष मेहनत घेतल्याचे जाणवते. त्याच प्रमाणे अनिता दातेने गंगुटीच्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे. जादूटोणा करणारीची वेषभूषा, तिच्या डोळ्यातील क्रूर भाव तसेच अहिराणी बोलीतील शब्दोच्चार, आव्हानात्मक हालचाली उल्लेखनीय आहेत. तिच्या उर्जेची कमाल आहे.
चित्रपटाची कथा हृषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांचेही आहे. मराठी चित्रपटात सहसा न दिसणारा थरार पाहण्याच्या उत्सुकतेने आलेल्यांची मात्र काहीशी निराशा होते. चित्रपटाचा पूर्वार्ध अगदीच संथ आहे. त्यामानाने उत्तरार्धात जरा वेग घेतला तरी अनपेक्षित गुंतागुंत वाढवल्यामुळे चित्रपट तितकासा प्रभावी होत नाही. विशेष उल्लेख केला पाहिजे. मिलींद जोगच्या सिनेमॅटोग्राफीचा. वाड्यातील प्लँचेटचा प्रसंग किंवा राधाच्या घरातील काही घटनांच्या वेळी कॅमेरा सुरेख फिरला आहे. पार्श्वसंगीतही योग्य वाटते. एक भयपट म्हणून नाही तरी विचित्र मानसिक विकार जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायला हरकत नाही.
लेखक दिग्दर्शक : हृषिकेश गुप्ते
कलाकार : अमृता सुभाष, अनिता दाते, विक्रम गायकवाड, राजन भिसे-सीमा देशमुख, अवनी जोशी, किशोर कदम, ज्योती मालशे.
Related
Articles
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
आई माता मंदिर ते पुना मर्चंट चेंबर पूल बांधणे आवश्यक
13 Jun 2025
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !