E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शॉर्टसर्किटमुळे गॅस टँकरला आग
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
सातारा, (प्रतिनिधी) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते पुणे लेनवर बोपेगावनजीक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गॅस टँकर जळाला. चालकाच्या समयसूचकतेमुळे व सुदैवाने टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून गॅसचा टँकर घेऊन चालक समुथिरापान्डी आप्पात्रय नाडा (वय-५८, सुप्रामनिपुरम, तामिळनाडू) हे पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बोपेगावनजीक उड्डाणपूल चढण्यापूर्वी टँकरच्या केबिनखालून वायरिंगने पेट घेतल्याने धूर निघत असल्याचे चालकाने पाहिले. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाने समयसूचकता दाखवत तत्काळ टँकर सेवा रस्त्यावर घेतला आणि खाली उतरला. पाहता पाहता लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. टँकरच्या केबिनमधून आगीच्या ज्वाला व धुराचे लोट बाहेर पडू लागले. सुदैवाने टँकर रिकामाअसल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन गाडी येईपर्यंत टँकर जळून खाक झाला होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अप्पासाहेब कोलवडकर, सहाय्यक फौजदार अविनाश डेरे, नितीन जाधव, दत्तात्रय शिंदे व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक बंद केली. वेळे ते आनेवाडीदरम्यान महामार्गावर वाहनांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याठिकाणी महामार्ग पोलिस केंद्र जोशीविहीर व आनेवाडी येथील टोलनाक्यावर आहे; परंतु दोन्ही ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्याने पोलिस व वाहनधारकांची ससेहोलपट होत असते. वाहने डोळ्यासमोर आगीत भस्मसात होताना पाहावे लागत आहे. याठिकाणी महामार्ग प्रशासनाकडून अग्निशमन यंत्रणा मिळावी, अशी मागणी होत आहे.
Related
Articles
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान
14 Jun 2025
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !