E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
भारती विद्यापीठात नाट्यकलेचे पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
पुणे
: भारती विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’तर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नाट्यकलेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी किरण यज्ञोपवित, अमित वझे व प्रथमेश विवेकी उपस्थित होते.
नाट्यकलेतील अभ्यासक्रमांत अभिनय, दिग्दर्शन, संहितालेखन आणि ‘उपयोजित रंगभूमी’ अशा चार प्रमुख शाखांचा समावेश आहे. भारतीय आणि पाश्चात्य रंगभूमीचा सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अभ्यास, अभिनयासाठी नटाचा सर्वांगीण विकास, रंगवेशभूषा, प्रकाश व ध्वनी तंत्रज्ञान, रंगमंच व्यवस्था आदी घटकांवर भर देण्यात आला आहे. रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांमध्ये लागणार्या विविध कौशल्यांचाही या अभ्यासक्रमात समावेश असल्याचे प्रा. साठे यांनी सांगितले. या अभ्यासक्रमांना मकरंद साठे, प्रवीण तरडे, प्रशांत दामले, उपेंद्र लिमये, किरण यज्ञोपवित, अनुपम बर्वे यांच्यासारखे प्रथितयश रंगकर्मी मार्गदर्शन करणार असून, एनएसीडी, एफटीआयआय तसेच परदेशातील तज्ज्ञांच्या कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम नवनी शैक्षणिक धोरण २०२० अन्वये तयार करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाईल, असेही यावेळी प्रा. साठे यांनी सांगितले.
‘उपयोजित रंगभूमी’ या विषयाचा पदवी व पदव्युत्तर स्तरावर अभ्यास सुरू करणारे भारती विद्यापीठ हे भारतातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि व्यावसायिक कौशल्य मिळवून त्यांना रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी आणि शिक्षण क्षेत्रात सक्षम करण्याचा उद्देश आहे.
Related
Articles
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक