आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप   

मुंबई : आयसीसीने नुकतीच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारी जारी केली. त्यानुसार भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठी झेप घेतली आहे. तर, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमची आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, टॉप- ५ फलंदाज फलंदाजांच्या क्रमावारीत कोणताही बदल झाला नाही.
 
आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियात धडाकेबाज फलंदाज ट्रेव्हीस हेड अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे ८५६ रेटिंग गुण आहेत. भारताचा अभिषेक शर्मा ८२९ रेटिंग गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. फिल साल्ट (८२५ रेटिंग गुण) तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिलक वर्मा (८०४ रेटींग गुण) आणि सुर्यकुमार यादव (७३९ रेटींग गुण) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
 
जोस बटलर ७३५ रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पथुम निस्सांका ७१४ रेटिंग गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. टीम सेफर्ट ७०८ रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. मात्र, नवव्या आणि दहाव्या क्रमांकामध्ये बदल झाला आहे. श्रीलंकेचा कुसल परेराने एका क्रमाकाने झेप घेतली असून तो आता नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानंतर न खेळता यशस्वी जैस्वालला दोन क्रमाकांचा फायदा झाला. 
 
तो आता दहाव्या क्रमांकावर आहे. बाबर आझम काही दिवसांपासून पाकिस्तानच्या टी-२० संघाचा भाग नाही. त्यामुळे त्याला ती क्रमांकाचे नुकसान झाले. त्याचे सध्या ६६१ रेटिंग गुण असून तो १२व्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच तो टॉप १० मधून बाहेर पडला आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाकिस्तानचा विकेटकिपर मोहम्मद रिझवान याचेही एका क्रमांकाने नुकसान झाले. त्याचे ६५४ रेटिंग गुणांसह १३व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 

Related Articles