कोयना शिवसागरात २२ टक्के पाणीसाठा   

सातारा, (प्रतिनिधी) : सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा अंदाज, जोरदार पावसामुळे तुलनेत अधिकचा जलसाठा, सिंचनासाठी घटलेली पाण्याची मागणी अशा समाधानकारक स्थितीत कोयना धरणाच्या जलवर्षावास रविवारी एक जूनपासून प्रारंभ झाला.  कोयना शिवसागरात २३.१२ अब्ज घनफूट (टीएमसी), धरण क्षमतेच्या जवळपास २२ टक्के पाणीसाठा आहे. 
 
गतवर्षी आजमितीला हाच पाणीसाठा २०.९७ अब्ज घनफूट म्हणजेच १९.९२ टक्के राहिला होता. एक जून २०२४ पासून शनिवारी ३१ मे अखेर कोयना शिवसागरातून एकूण १८१.७५ अब्ज घनफूट पाणी वापर झाला आहे. 

Related Articles