E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
31 May 2025
पावसाची ओढ
अंतरंगातला ओलावा सरता सरत नाही
अन् पावसाची ओढ जरा कमी होत नाही
पडण्याआधी सृष्टी झाकोळतो हा पुरती
विश्वासात घेऊनी मेघाना करी गूज मस्ती
झरझर जलधारांचे कुणा मोज-माप नाही......
वृक्ष वेली, बंध-बांध चिंब चिंब भिजवतो
’आंदळून’ तलावांना शेत मळे पिकवतो
ना कसली पर्वा याला फिकीर कशाची नाही.....
ऋतू कुशीतून चाले वर्षा नर्तन तालात
झिंग चढे सरसरणारी आपुल्या नादात
निळा पिसारा मिटण्या मोराला घाई नाही....
परमात्मा उधळी नभातूनी जल मोती
आत्मा ओंजळ भरीतो कधी न होण्या रीती
तृषा अवनीची नित नितशी वर्धिष्णु राही...
- कविता मेहेंदळे
मो. ९३२६६ ५७०२७
-------
यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्वतःला झिजवावे लागतेच, तेव्हाच आकाशात उंच भरारी घेता येते. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्य आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संघर्षाला सामोरे जावे लागते. यशस्वी लोक अपयशांमधून शिकतात, मेहनत घेत राहतात आणि कधीही हार मानत नाहीत. जसे सोनं तापल्यावरच शुद्ध होतं, तसेच परिश्रम आणि जिद्दीनेच मोठे यश मिळवता येते. म्हणूनच, स्वप्न पूर्ण करायची असतील, तर कष्ट, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रयत्नांची शिकस्त करावी लागते.
-------
परिक्षेतील एक प्रश्न : कोण कोणास म्हणाले?
तुम्हाला भेटून आनंद झाला !
उत्तर : आनंदची आई, आनंदच्या वडिलांना...!
-------
गोष्ट खूप छोटी असते हो....
तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बर्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते...
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची...
स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं...
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची...
अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात....
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची...
आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो....
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची...
घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्हज द्यायचे. कधी स्कीनचं मलम देऊन टाकायचं...
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची...
कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टँडवर न लावता, सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं थँक यू ऐकायला मस्त वाटतं...
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची...
-------
Related
Articles
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
नीट युजी परीक्षेचा निकाल कृषांग जोशी राज्यात पहिला
15 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
नीट युजी परीक्षेचा निकाल कृषांग जोशी राज्यात पहिला
15 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
नीट युजी परीक्षेचा निकाल कृषांग जोशी राज्यात पहिला
15 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
नीट युजी परीक्षेचा निकाल कृषांग जोशी राज्यात पहिला
15 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !