E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
Samruddhi Dhayagude
30 May 2025
जय-पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करतात
मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणाची कुजबूज सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची तोंडभरून स्तुती केल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार हे जय, पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात. या वयातही शरद पवार काम करतात, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची प्रशंसा केली.
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात प्रकट मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी, शरद पवार यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण, काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण, त्यांचे सातत्याचे मी नेहमीच कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत असतात. जय-पराजयाची तमा न बाळगता काम करत राहतात, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष असल्याचे फडणवीस म्हणाले.
अजित पवार, एकनाथ शिंदे संवादात चांगले नाहीत
या मुलाखतीत शरद पवार यांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असा चिमटा काढला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगले आहे? याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवली आहे. अर्थात, हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील, असेही ते म्हणाले. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे शरद पवार गटाच्या भावी वाटचालीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Related
Articles
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !