E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियाने युक्रेनवर डागले २७३ ड्रोन
Samruddhi Dhayagude
19 May 2025
कीव : रशिया आणि युक्रेनची तुर्कीमध्ये शांतता चर्चा सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर २७३ ड्रोन डागले. युक्रेनवरील रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी आहेत. युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, बहुतेक रशियन हल्ल्यांमध्ये कीवचा मध्य प्रदेश आणि देशाच्या निप्रोपेट्रोव्हस्क आणि डोनेत्स्क प्रदेशांच्या पूर्वेकडील भागांना लक्ष्य करण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये रशियाने २६७ ड्रोन हल्ले केले होते.
युक्रेनियन संसदेचे अध्यक्ष रुस्लान स्टेफनचुक म्हणाले, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जवळजवळ तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, रविवारी रशियाने आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे ९ तास सायरन वाजत होते. या हल्ल्यात निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले असून, २८ वर्षीय युक्रेनियन महिलेचा मृत्यू झाला, तर एका मुलासह तीन जण जखमी झाले.
रशिया-युक्रेनमधील चर्चा
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी पहिली चर्चा १६ मे रोजी तुर्कीतील इस्तंबूल येथे झाली. या बैठकीला दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुर्कीने यासाठी मध्यस्थी केली होती. ही बैठक केवळ ९० मिनिटे चालली.
युद्ध थांबवण्याबाबत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही. युक्रेनियन अधिकार्याच्या मते, तात्पुरती संघर्षबंदी ही अट होती, मात्र ती रशियाने स्वीकारण्यास नकार दिला.रशिया आणि युक्रेनमधील युद्ध फेब्रुवारी २०२२ पासून सुरू आहे. गेल्या ३ वर्षात पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये शांततेबाबत थेट चर्चा झाली. यापूर्वी झेलेन्स्की आणि पुतीन शांतता चर्चेत सहभागी होतील याबद्दल चर्चा झाली होती; पण गुरुवारी पुतीन यात सहभागी होणार नसल्याचे क्रेमलिनने सांगितले.
Related
Articles
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
उन्हाळ्यातही एसी, कोल्ड्रिंक्सच्या विक्रीत घट
06 Jun 2025
तात्पुरत्या संघर्षबंदीचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला
31 May 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
उन्हाळ्यातही एसी, कोल्ड्रिंक्सच्या विक्रीत घट
06 Jun 2025
तात्पुरत्या संघर्षबंदीचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला
31 May 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
उन्हाळ्यातही एसी, कोल्ड्रिंक्सच्या विक्रीत घट
06 Jun 2025
तात्पुरत्या संघर्षबंदीचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला
31 May 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
उन्हाळ्यातही एसी, कोल्ड्रिंक्सच्या विक्रीत घट
06 Jun 2025
तात्पुरत्या संघर्षबंदीचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला
31 May 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?