भुवनेश्वर : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बेपत्ता जवानाचा मृतदेह रविवारी ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्यात एका झाडाला लटकलेला आढळला. गणेशराम भोई असे मृत जवानाचे नाव असून, तो १६ मे पासून बेपत्ता होता. बोलांगीर जिल्ह्यातील घासिया गावातील तो रहिवासी होता. काही गावकर्यांनी भोईला एका निर्जन ठिकाणी झाडाला लटकलेले पाहिले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. गणेशराम भोई हा सुट्टीवर त्याच्या गावी आला होता. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Fans
Followers