श्रीरामपूरमध्ये ३० लाखाचा गांजा पकडला   

श्रीरामपूर (वार्ताहर) : तालुक्यातील खैरी निमगाव रस्त्यावर गुरुवारी रात्री श्रीरामपूर शहर पोलिसांनी  २०१ किलो गांजा जप्त केला. यावेळी ज्ञानेश्वर जाधव (४५) व रमेश जाधव (३८, दोघे दुगाव, ता. चांदवड) या दोघांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. 
 
याबाबत माहिती अशी, पोलिसांना चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १० गोण्यांमधून २०१ किलो वजनाचा ३० लाख २४ हजाराचा गांजा तसेच १० लाखाची चारचाकी असा ४० लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने केली. 

Related Articles