E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
यंदा सरासरीपेक्षा जादा पावसाची शक्यता
Samruddhi Dhayagude
15 May 2025
पूरस्थितीत हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा : विभागीय आयुक्त
पुणे : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सुक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनील फुलारी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हास्तरांवर महसूल पोलिस, जलसंपदा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग आदिंनी समन्वयासाठी बैठक घ्यावी औषधे आणि रास्त भाव दुकानातील अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहिल याची दक्षता घ्यावी, पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. पाऊस अधिका झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहातील याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जलसंपदा विभागाने सीडॅक प्रतिमान उपयोगात आणून पूरस्थितीची माहिती देण्याचे नियोजन करावे. आवश्यक उपाययोजनांसाठी हवामान विभागांशी संपर्क ठेवावा जलसंपदा विभागाने पुणे विभागात असणार्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि मुलांची तपासणी करावी पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्राचे नियोजन करावे. आवश्यक तेथे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागोने आंतरराज्य बैठका तातडीने घ्याव्यात.
एनडीआरएफने पुण्यासाठी २ पथके कायमस्वरूपी ठेवावीत आणि एक पथक राखीव असावे तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात एक पथक असावे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने पूर परिस्थितीत वाहतूक वळविण्याबाबतचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. विशेष पोलिस महानिरिक्षक फुलारी यांनी विभागातील नियोजना विषयी माहिती दिली. पूरस्थितीची पूर्व कल्पना देण्यासाठी जलसंपदा विभागाचे सीडॅक आणि हवामान विभागाशी समन्वय ठेवण्याचा सूचना पिंपरी चिंचवड महापालिा आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.
बैठकीला आरोग्य, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, एनडीआरएफ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय