नवी दिल्ली : पाकिस्तानी समाजमाध्यमांवरील अकाऊंट्सवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानातील मनोरंजनाच्या डिजिटल कंटेंटवरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार ओटीटी प्लॅटफॉर्म, यूट्यूब आणि सर्व प्रकारच्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून पाकिस्तानमध्ये बनवलेल्या वेब सीरिज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग मीडिया कंटेंट, जे सबस्क्रिप्शन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उपलब्ध आहेत, ते त्वरित बंद करण्याचा सल्ला दिला गेला आहे.
Fans
Followers