E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणार्या पतीला अटक
Wrutuja pandharpure
07 May 2025
पुणे
: पत्नीचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून भूमकर पुलापासून जाणार्या आरोपी पतीला गस्तीवर असणार्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. मात्र, खूनाचे कारण अद्याप कळू शकले नाही.
बबीता राकेशकुमार निसार (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राकेशकुमार रामनाईक निसार (वय २८ वर्षे, रा. समृद्धी ग्रीन्स बिल्डिंग, फ्लॅट नं. १०६, साईधाम सोसायटी, लायगुडेमळा, धायरी पुणे, मूळ रा. चकोरागाव, पोस्ट घडा, ता. फत्तेपूर बसखारी, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉस्टेबल ज्ञानेश्वर आखाडे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूमकर पुल परिसरात नेहमीप्रमाणे पोलिस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी हा दुचाकीवरून संशयास्पद जात असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी लागलीच त्याला अडविले. त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने पत्नीचा रागाच्या भरात गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वामी नारायण मंदिराच्या दिशेने जात असल्याचे देखील त्याने पोलिसांना सांगितले.
गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी याबाबतची माहिती सिंहगडचे पोलिस उपनिरीक्षक सावंत यांना दिली. बबिताचा मृतदेह ससून रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे. हा गुन्हा समृद्धी ग्रीन्स बिल्डिंग, धायरी येथे घडल्याने गुन्ह्याची नोंद नांदेड सिटी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
खूनातील कारण अद्याप गुलदस्त्यात
सद्यस्थितीत राकेशने हा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला आहे, याचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नाही. नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. पोलिस राकेशची चौकशी करीत असून त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, घरगुती संबंध आणि इत्तर बाबींचा तपास करत आहेत.
Related
Articles
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचा १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात
31 May 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात