अनेकांची झोप उडणार : मोदी   

 

केरळच्या विंझिजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन
 
तिरुवनंतपुरम : केरळमधील विंझिजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांची उपस्थिती होती. बंदराचे उद्घाटन पाहून अनेकांची झोप उडाली असेल, अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. ती पाकिस्तानला उद्देशून होती की विजयन आणि थरुर यांच्या उपस्थितीवरुन काँग्रेससाठी केली ? याची चर्चा मात्र, रंगली.
 
विंंझिजम आंतरराष्ट्रीय बंदरासाठी सुमारे ८ हजार ८६७ कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. मोदी म्हणाले, बंदराचा लाभ केरळससह संपूर्ण भारताच्या आर्थिक स्थैर्यासाठी होणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, विजयन हे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे प्रमुख स्तंभ आहेत. विजयन आणि शशी थरुर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माझ्यासोबत व्यासपीठावर आहेत. त्यामुळे अनेकांची झोप निश्चित उडणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे भाषण भाषांतरीत करुन ऐकवले गेले. त्या प्रसंगी भाषांतर व्यवस्थित केले गेले नाही, असेही सांगण्यात येते. एकंदरीत अनेकांची झोप उडणार आहे हा संदेश ज्यांच्यासाठी आहे  अर्थात सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि त्यांच्या समर्थकांसाठी होता. तो त्यांना बरोबर समजला आहे, असेही मानण्यात येते.
 
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा वर्षांंतील विकासाचा आढावा घेतला. अधिक बंदरे आणि ती विकसित करण्यात आघाडीवर असलेल्या दहा देशांच्या यादीत भारत पहिल्या तीन क्रमांकावर आहे, असे सांगताना मोदी म्हणाले, दहा वर्षांत बंदरांची संख्या दुप्पट झाली आहे. ती निर्माण करण्याचा वेळ ३० टक्के कमी झाला आहे. विंझिजम बंदर ८ हजार ८०० कोटी रुपयांत तयार झाले आहे. त्या द्वारे होणारा व्यापार भविष्यात तिप्पट होणार आहे. बंदरावर मोठी व्यापारी जहाजे यावीत, अशी रचना केली आहे. आतापर्यंत भारताचा ७५ टक्के व्यापार परदेशी बंदरांवर अवलंबून होता. त्यामुळे मोठा महसूल बुडत होता. आता मात्र बंदरांचा विकास केल्यामुळे भारतीय माल विंझिजम बंदरामार्गे परदेशात पाठवणे शक्य होणार आहे.  महसूल वाचणार असल्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचा लाभ थेट भारतीयांना मिळणे सोपे होणार आहे.
 
बंदरांच्या विकासातून देशात समृद्धीचे वारे 
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, केरळमधील विझिंजम बंदर उद्योगपती गौतम अदानी समूहाने तयार केले. त्यामुळे गुजराती नागरिकांना  त्यांचा कदाचित राग आला. अदानी यांनी  बंदर साकारले. त्यामुळे निराश झाले होते. मात्र, केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असून बंदर विकासासाठी त्यांनी अदानी यांच्यासोबत भागीदारी केली. हा देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा बदल ठरला आहे. या वेळी मोदी यांनी भारताच्या ऐतिहासिक विकासात केरळमधील आणि देशांतील बंदरांनी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. समुद्रमार्गे व्यापाराने देशात एकेकाळी भरभराट झाली होती. समुद्र व्यापारात भारत एकेकाळी आघाडीवर होता. त्यामुळेच समृद्धीची द्वारे देशाला खुली झाली होती.  त्यामुळे केेंद्र सरकारने बंदरांचा विकास करुन समुद्रमार्गे व्यापाराला चालना दिली आहे. 
 

Related Articles