राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची फेररचना   

नवी दिल्ली : पहलागाममधील नरसंहारानंतर भारत-पाकिस्तानात तणाव वाढला आहे. यादरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची फेररचना केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
 
जोशी यांच्यासह मंडळावर एकूण ७ सदस्य असतील. त्यात माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी.एम. सिन्हा, दक्षिण विभागाचे माजी लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आणि रिअर अ‍ॅडमिरल मोंटी खन्ना यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे दोन भारतीय पोलिस सेवेतील निवृत्त अधिकारी त्यावर आहेत. सात सदस्यांच्या मंडळात बी. वेंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस अधिकारीदेखील समावेश आहे.

Related Articles