मुंबई,(प्रतिनिधी) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाखांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी, मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Fans
Followers