सोलापुरात धावत्या सिटी बसला आग   

सोलापूर-हैदराबाद रस्त्यावरील घटना; सर्व प्रवासी सुखरूप

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूर ते मुस्ती गावा दरम्यान धावणार्‍या सिटी बसला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ही घटना सोलापूर-हैदराबाद रोडवरील बोरामणी जवळील कीर्ती गोल्ड ऑइल मिल समोर घडली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरवरून मस्तीकडे जात असलेली सिटी बस दुपारी दोन महिन्यात सुमारास सोलापूरवर निघाली होती. बोरामणीच्या अलीकडे असताना आले असता यावेळी गाडीत शॉर्ट सर्किट होत असल्याचे चालकाला जाणवले. त्यांनी तात्काळ बस बाजूला घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर गाडीतले प्रवासी, वाहक व परिसरातील नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु आगीने रौद्ररूप घेतले होते. यानंतर घटनास्थळी अग्निशामक दल, पोलीस दाखल झाले. घटनास्थळी वेळेत मदत मिळेपर्यंत बस पूर्ण जळून खाक झाली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत. यामध्ये गाडीचे तसेच प्रवाशांच्या जवळ असलेल्या साहित्याचे नुकसान झाले आहे. 
 

Related Articles