E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आंबेगावात पाणी असूनही पिके वाळण्याचा धोका
Samruddhi Dhayagude
30 Apr 2025
शेतकरी त्रस्त; शेती पंपाचा वीज पुरवठा सुरुळीत करणे गरजेचे
मंचर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यात पाणी असूनही पिके वाळून जाण्याचा धोका महावितरण कंपनीच्या विजेच्या लपंडावामुळे वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.ऐन उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. परंतु वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पीके जळून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागली आहे. शेती पंपाचा वीज पुरवठा सुरुळीत होण्यासाठी महावितरण कंपनीने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
साखर हंगाम संपला असुन अनेक कारखान्यांकडून अंतिम टप्प्यातील बिले जमा होत आहेत. सध्या तरकारी पिकांना मिळत असलेला भाव परवडत नाही, त्यातच रासायनिक खतांच्या भरमसाट वाढलेल्या किमती यातूनही शेतकर्यांची मार्ग परिक्रमाना सुरू असून पिके जगवण्यासाठी धडपड सुरू आहे. प्रत्येक वर्षी शेतकर्यांना वेगवेगळे समस्या निर्माण होत आहेत. मात्र पाणी असून ते पिकांना देता येत नसल्याने शेतकर्यांची अडचण होत आहे. तालुक्यातील कृषी पंपासाठी आठ तास वीज दिली जाते. मात्र, वीजेचा वारंवार लपंडाव सुरू आहे. यामुळे पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. या प्रकारामुळे पाणी असून पिके वाळून जात आहेत. तसेच महावितरणकडून कमी दाबाने वीज पुरवठा केला जात आहे. या प्रकारामुळे वीज असूनही कृषिपंप सुरू होत नाही.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून हा प्रकार वाढला आहे. शेतकरी वारंवार कर्मचारी, वायरमन यांच्याशी संपर्क करूनही उपाययोजना होत नाहीत. तालुक्यातील तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस वर गेल्याने पिकांना पाणी देणे क्रमप्राप्त झाले आहे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असून कंत्राटी कर्मचार्यांची संख्या जास्त आहे.या कर्मचार्यांना मर्यादा असतात. तरीही या कर्मचार्यांच्याकडून धोकादायक पद्धतीने कामे करून घेतली जात आहे. ही कामे नीट नाही झाली तर त्याचा फटका शेतकर्यांना बसत आहेत. साडेसात एचपीपर्यंत वीज माफी असल्याने या शेतकर्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र अजूनही या समस्यांवर ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. यामुळे शेतकरी कंटाळून सौरऊर्जा पंप घेण्याकडे कल वाढला आहे.
विजेची मागणी वाढल्यामुळे वीज वारंवार खंडित होत आहे. ही समस्या अनेक ठिकाणी जाणवत आहे. उन्हाळ्यात, विशेषतः, तापमान वाढल्याने एसी आणि इतर ऊर्जा वापरणार्या उपकरणांची मागणी वाढते, ज्यामुळे वीज पुरवठ्यावर ताण येतो आणि वीज खंडित होतो. वीज पुरवठा सुरुळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
- शांताराम बांगर, कार्यकारी अभियंता महावितरण
वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचला असताना दुसरीकडे वीज नसल्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यंदाचा उन्हाळा कमालीचा कडाका जाणवतो आहे. उकाडा असह्य झाला आहे. सकाळी १० पासूनच उन्हाच्या तीव्रतेने नकोसे होत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाचा हा तडाखा कायम राहतो आहे. त्यात विजेचा लपंडाव सातत्याने सुरू आहे. वीज ग्राहक सातत्याने तक्रारी करत असतानाही त्याची दखल घेतली जात नाही.
- सुनील बाणखेले, माजी उपसरपंच मंचर
उन्हाळ्यात थंड पाण्याची बाटली, लस्सी, विविध प्रकारच्या आइस्क्रीम व अन्य थंड पेये दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवली जातात. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने अशा पदार्थांचे मोठे नुकसान होत असून त्यातून व्यावसायिकांना फटका बसत आहे.
- अजय काटे, हॉटेल मालक
Related
Articles
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जखमी
13 May 2025
एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त
15 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जखमी
13 May 2025
एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त
15 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जखमी
13 May 2025
एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त
15 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जखमी
13 May 2025
एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका