चांदणी चौकात पीएमपी बसने वाहनांना उडवले   

दोन जण गंभीर

पुणे : पीएमपीएमएल बसचे ब्रेक निकामे झाल्यामुळे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चांदणी चौकामध्ये भीषण अपघात घडला. यामध्ये कोथरूडच्या दिशेने येणार्‍या बसने ब्रेक निकामे झाल्यानंतर सहा ते सात वाहनांना धडक दिली. यामध्ये दोन रिक्षा, एक मोटार आणि तीन दुचाकी यांचा समावेश आहे. या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच असलेल्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
चांदणी चौकातून मंगळवारी सायंकाळी पीएमपी बस कोथरूडच्या दिशेने येत होती. त्यावेळी बस उतारावर असताना त्याचे ब्रेक निकामे झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने रस्त्यावरून जाणार्‍या दोन रिक्षा, एक मोटार आणि तीन दुचाकींना धडक दिली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, चांदणी चौकाकडून कोथरूडकडे येणार्‍या रस्त्यावर वाहतुककोंडी झाली होती.
 
काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतुककोंडी सोडवून वाहतुक सुरळीत केली. जखमींना रूग्णालयात हलवले. पोलिसांकडून बसचे तांत्रिक स्थिती तपासण्याचे काम सुरू आहे. अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 
 

Related Articles