व्हॉट्सऍप कट्टा   

जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे.
आणि हरणं ?
ती जंगलात राहतात....
---
मालवणी स्पेशल
ही दुनिया गोल आसा.. पुरावो होयो..??
झुरळ उंदराक घाबरता,
उंदिर मांजराक घाबरता,
मांजार कुत्र्याक घाबारता,
कुत्रो माणसाक घाबारता, .
माणुस आपल्या बायकोक घाबारता, 
आणि बायको झुरळाक. . . .! .
ह्या चक्र असाच फिरत रवता
------------------
डोक्यामध्ये दगड घालून...  खून त्याचा केला...
मरणारा तर मेला ... नंतर मारणाराही मेला...
पण तो दगड तिथेच पडलाय, 
सांगतोय जगाला...
‘‘मी किती पराक्रम केला...
दोघांचाही जीव घेतला...’’
मित्रांनो, सावधान...!
समाजात असे काही दगड आहेत...
जे आपल्याला भांडायला लावतात.
आपण एकमेकांची डोकी फोडतो...
नुकसान आपले होते... बरबाद आपण होतो...
आणि... दगड मात्र बाजूला होतात... म्हणून शिवतंत्र सांगते :
‘‘वध होण्याआधी सावध व्हा... बरबाद होण्याआधी आबाद व्हा...’’ 
मित्रांनो, 
शिवरायांचे शिवतंत्र समजून घ्या. जे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी..., 
किंवा मोठेपणासाठी... जवळची माणसे तोडतात...
असे लोक छोट्या छोट्या... लुटुपुटुच्या लढाया जिंकतील...
पण अंतिम युद्ध कधीच...
जिंकू शकत नाहीत... कारण...
घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे...
बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...
म्हणून शिवतंत्र सांगते...
‘‘जोडता नाही आले तर... 
जोडू नका...
पण लोकांना तोडू नका.’’
--
मोबाईल मूळे तयार झाल्या या नवीन म्हणी -
१) स्वामी तिन्ही जगाचा, चार्जर विना भिकारी.
२) बुडत्या बॅटरीला चार्जरचा आधार.
३) चेहेर्‍यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार?
४) नको ते अ‍ॅप आणि डोक्याला ताप.
५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर. 
६) आला मेसेज, केला फॉरवर्ड.
७) एक न धड आणि भाराभर ग्रुपमेंबर.
८) खाली मुंडी आणि व्हाट्सअ‍ॅप धुंडी.
---
पेशंट : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर :  लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून) : आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
 

Related Articles