उत्तर प्रदेशातून १०० टक्के पाकिस्तानी नागरिक बाहेर   

लखनौ : उत्तर प्रदेशातून १०० टक्के पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना पोलिसांच्या मदतीने सीमेपर्यंत पोहोचविले. त्यामुळे त्यांचा मायदेशी परत जाण्याचा प्रवास सुखरुप झाला असल्याचा दावा सरकारने सोमवारी केला. अशा प्रकारची कारवाई करणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य 
ठरले आहे.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात एकही पाकिस्तानी नागरिक राहता कामा नये. तशी पावले विविध राज्यांनी उचलावीत, असे आदेश विविध राज्यांना केंद्र सरकराने नुकतेच दिले होते. त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी उत्तर प्रदेशाने केली.  राज्यात असलेला एकमेव पाकिस्तानी नागरिकाला उद्या (बुधवारी) बाहेर काढले जाईल, असे सरकारने सांगितले. पोलिस आणि गुप्तहेर संघटनांच्या मदतीने पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम राबविली होती. ती अतिशय यशस्वी ठरली आहे, असे सरकारने म्हटले आहे. २४ तासांत  पाकिस्तानी नागरिकांना हुडकून काढले आणि त्यांना परत पाठवले आहे. मात्र, त्यांची आकडेवारी सरकारने दिलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांच्या हकालपट्टीबाबतचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. नागरिकांना बाहेर काढून मायदेशी पाठविण्यासाठी हालचाली केल्या. नागरिकांना पकडून त्यांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे नागरिक मायदेशात सुखरुप परतण्याचा मार्गही सोपा झाला होता. राज्यातील ७५ जिल्ह्यांत कारवाईसाठी हायत अलर्ट देखील सरकारने दिला होता. त्यामुळे जलदगतीने कारवाई करणे अधिक सोपे झाले होते. पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वकष पावले उचलून पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई केली आहे. 
 

Related Articles