‘रावणाला मारणे हा अहिंसेचा भंग नाही’   

दहशतवाद्यांसंदर्भात भागवत यांची भूमिका 

नवी दिल्ली : भारत हा अहिंसा पाळणारा देश. मात्र, रावणाला मारणे हा अहिंसेचा भंग होत नाही. आम्ही आमच्या शेजार्‍यांना कमी लेखत नाही. प्रजेचे कल्याण ही राजाची जबाबदारी आहे, तो त्याचे कर्तव्य पार पाडेल, तो त्याचा धर्म आहे आणि तो ते करेल, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 
 
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले, धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. केवळ पूजा अर्चा म्हणजेच धर्म नाही. हिंदू समाजाने आपल्या धर्माबद्दल सखोल ज्ञान मिळवून ते जगासमोर योग्य प्रकारे आणावे.  भविष्यात जगाला भारत हा पारंपारिक ज्ञानाचा नवा मार्ग मिळू शकेल.  अहिंसेच्या मुद्द्यावर ते म्हणाले, अहिंसा हा भारतीयांचा मूलभूत स्वभाव आहे. आमची अहिंसा लोकांना बदलण्यासाठी आहे. 

Related Articles