पर्यटकांशिवाय आमचे जीवन अपूर्ण...   

जखमींना मदत करणार्‍या शाल विक्रेत्याची भावना 

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित झाल्या आहेत. यातील एक चित्रफीत मानवतेचे दर्शन घडवणारी आहे.  तेथील फेरीवाला सज्जाद अहमद भट एका जखमी पर्यटकाला पाठीवर घेऊन रूग्णालयात जाताना दिसत आहे. पर्यटकांना मदत करताना त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.  
 
सज्जाद अहमद भट हा घाटीत शाल विकतो. मंगळवारी पहलगाम पोनी असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वाहिद वान यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे त्यांच्या सदस्यांना खोर्‍यात सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सतर्क केले, त्यानंतर भट घटनास्थळी पोहोचले. 
 
तेथील परिस्थितीचे विदारक चित्र सांगताना भट म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. जवळपास २६ जण ठार झाले होते. तर १७ जण जखमी होते. जखमींपैकी अनेकांना रूग्णालयात नेले. ज्या जखमींना चालता येत नव्हते त्यांना पाठीवरून नेले. महिलांना घोड्यावर बसवून सुरक्षित स्थळी नेले. पर्यटकांना रडताना पाहिल्यावर आमच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांच्या आगमनाने आमच्या घरातील दिवे उजळतात, त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. मानवता ही धर्मापेक्षा मोठी आहे.
 

Related Articles