अमरनाथ यात्रेपूर्वी रंगीत तालीम ?   

अमरनाथ यात्रा पहलगाममार्गे जाते. यंदा ३ जुलैपासून यात्रेला प्रारंभ होत असून ती ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सुमारे ३८ दिवस यात्रा सुरू राहणार. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेचा मार्ग पहलगाम मार्गे जातो. पहलगाम येथे यात्रेचा बेस कँम्प असतो. तो सर्वात मोठा कॅम्प मानला जातो. 
 
यात्रेत हजारोंच्या संख्यनेे देशभरातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. त्यांचे स्वागत स्थानिक मुस्लिम धर्मीय नागरिक करत आले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटनस्थळावर हल्ला करुन केवळ हिंदू पर्यटकांना ठार मारले आहे. त्यामुळे आता अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. 
 
दहशतवाद्यांनी केवळ पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून निर्मम हत्या केली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेवर देखील पाकिस्तानी दहशतवाद्यांचा डोळा असणार आहे.  यात्रेपूर्वी हल्ला करुन दहशतवाद्यांनी हल्ल्याची रंगीत तालीम केली तर नसावी, असा संशय आता व्यक्त होत आहे. 
 

Related Articles