कृष्णा नदीत बुडून जुनियर आर्टिस्टचा मृत्यू   

अंधार पडल्यामुळे मदतकार्यात अडथळे

सातारा, (प्रतिनिधी) : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती चित्रपटातील शूटिंग संगम माहुली येथील परिसरात सुरू होते. या शूटिंग दरम्यान, कृष्णा नदीच्या पाण्याचा अंदाज नाल्याने युनिटमधील एक जूनियर आर्टिस्ट पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. त्यामुळे काही काळ चित्रपटातील शूटिंग थांबले होते छत्रपती शिवेंद्र सिंह राजीव भोसले रेस्क्यू टीमच्या वतीने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता.
 
सौरभ शर्मा वय २८ राहणार घाटकोपर पश्चिम मूळ रा राजस्थान असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सौरभ हा रितेश देशमुख यांच्या प्रोडक्शन निर्मितीमधील एक जुनियर आर्टिस्ट होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडली दिवसभराचे शूटिंग झाल्यानंतर पोहण्याच्या निमित्ताने सौरभ हा कृष्णा नदीच्या डोहात उतरला होता. डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात ओढला जाऊन बुडाला. युनिटच्या काही कर्मचार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तो सापडू शकला नाही.
 
 रितेश देशमुख आणि त्यांच्या युनिटने घटनास्थळावरील घाटावर गर्दी केली होती. या घटनेची खबर शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमला तात्काळ कळवण्यात आली. पाच सदस्यांची पथक तेथे घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सौरभच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र, अंधारामुळे या कामावर मर्यादा येत होत्या. सातारा शहर पोलिसांनी या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.

Related Articles