E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
केरळच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहतूक जहाजाचा अपघात झाला. समुद्रात कंटेनर वाहतूक करणाऱ्या सिंगापूरचा ध्वज असलेल्या 'MV WAN HAI 503' या कंटेनर जहाजात स्फोट झाला. हा स्फोट कोचीपासून सुमारे ३१५ किमी पश्चिमेला समुद्रात असलेल्या जहाजाच्या 'अंडर डेक'मध्ये झाला. या स्फोटात चार क्रू मेंबर्स बेपत्ता झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. जहाजावर एकूण २२ क्रू मेंबर्स होते आणि हे जहाज कंटेनर्सनी भरलेले होते.
स्फोटानंतर बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने तात्काळ मदतीसाठी रवाना झाले. या स्फोटामुळे ५० कंटेनर समुद्रात पडले असल्याचे सांगण्यात आले असून, जहाजावर एकूण ६०० पेक्षा जास्त कंटेनर होते. नौदलाने आपल्या जहाजांसोबत तटरक्षक दलाची तीन जहाजे घटनास्थळी पाठवली आहेत.
स्फोटाचे कारण अस्पष्ट, मदत कार्य सुरू
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कंटेनरच्या आतूनच स्फोट झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, "कोझिकोडच्या बेपोर किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजात स्फोट झाला आहे. हे जहाज सिंगापूरचे ध्वज असलेले कंटेनर जहाज आहे, ज्याची लांबी २७० मीटर आणि ड्राफ्ट १२.५ मीटर आहे. हे जहाज ७ जून रोजी कोलंबोहून मुंबईसाठी निघाले होते."
बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू असून, जखमींना तात्काळ प्रथमोपचार दिले जात आहेत. तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान आणि जहाजे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. तसेच, घटनास्थळी सर्व मदत पुरवली जात आहे. तटरक्षक दलाने घटनावर लक्ष ठेवून बचाव कार्य सुरू केले आहे. याशिवाय, जहाजावरील उर्वरित क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
Related
Articles
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत