E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपी भाडेवाढीमुळे पुणेकरांच्या खिशावर दरोडा
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन
पुणे
: ’पीएमपीएमएल’ प्रशासनाने बस प्रवास दरात अन्यायकारक वाढ करून सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे. प्रशासनाच्या या मनमानी निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी व घोडागाडीतून प्रवास करीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्ष व नेत्यांच्या विरोधात तसेच पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
पुणेकरांची भरभरून मते घेऊन गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या राज्य व केंद्र सरकारने आता मात्र पुणेकरांना वार्यावर सोडले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेचा प्रवासही आता राज्यातील महायुती सरकारने त्रासदायक करून ठेवला आहे. प्रवास दरात झालेली भरमसाठ दरवाढ नियमितपणे बसने प्रवास करणार्या सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी नाही. ‘पीएमपीएमएल’ प्रशासन हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा पुणेकरांना जुन्या पुण्यात होत असलेल्या प्रवासाचाच मार्ग उपलब्ध असल्याचे संकेत दिल्याने पक्षाच्या वतीने बैलगाडी व घोडागाडीतून प्रवाशांना प्रवास घडवून आणण्यात आला.
महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या आंदोलनावेळी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी घोडागाडी, बैलगाडीतून स्वत: प्रवास करीत व प्रवाशांना प्रवास करायला लावून अनोखे आंदोलन करीत प्रशासनाला प्रतीकात्मक चपराक लगावली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पीएमपीएमएल बस ही पुण्याची जीवनवाहिनी आहे. दररोज लक्षावधी पुणेकर बस प्रवास करीत असतात. परंतु, प्रशासनाने बससेवा ही मूलभूत सेवा असून, ती कल्याणकारी भावनेने राबविण्याऐवजी मनमानी कारभार करीत भरमसाठ दरवाढ केली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत आहे. त्यामुळे, ही दरवाढ त्वरित रद्द करावी व तत्काळ जुनेच दर लागू करावेत, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार जयदेवराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, उदय महाले, निलेश निकम, श्रीकांत पाटील, औदुंबर खुणे पाटील, रोहन गायकवाड, योगेश पवार, सुवर्णा सावर्डे, आशा साने, सुवर्णा माने, स्वाती पोकळे, वैशाली थोपटे, प्रभावती भूमकर, किशोर कांबळे, आनंद सवाणे, पोपटराव खेडेकर, वैजनाथ वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !