E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘मिसींग लिंक’च्या परीक्षेत चंद्रकांत पाटील पास
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
पुणे
: क्षेत’ कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हेच पास झाले असून, भाजपचे (महायुतीचे) इतर आमदार मात्र ही कामे मार्गी लावून घेण्यात नापास झाल्याचे दिसत आहे. कोथरुड मतदारसंघातील तीन ‘मिसींग लिंक’चे काम आमदार पाटील यांनी मार्गी लावले आहे. तर निधी नसल्याने इतर मिसींग लिंकच्या कामासाठी जागा ताब्यात घेण्यात अडचणी येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
शहराच्या विकास आराखड्यात रस्ते आखणी केली असुन, काही रस्ते विकसित केले आहे. जागा ताब्यात न आल्याने या रस्त्यांची दुसर्या रस्त्यांशी जोडणी झाली नाही. अशा एकूण ३० मिसिंग लिंक प्राधान्याने पुर्ण करून वाहतुक सुरळीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेणे, आणि रस्ते बांधणीसाठी ८५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहराच्या विविध भागातील या मिसींग लिंकचा समावेश आहे. कोथरुड मतदारसंघातील तीन मिसींग लिंक तातडीने पुर्ण करून घेण्यात आमदार पाटील यांनी बाजी मारली आहे. यामध्ये कात्रज ते देहू बायपास मार्गाशेजारील सेवा रस्त्याला जोडणार्या एकलव्य कॉलेजजवळील मिसींग लिंकच्या कामासाठी आवश्यक दोन गुंठे जागा ताब्यात आली आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कात्रज ते देहू बायपास महामार्गाला जोडणारी कोथरुड मतदारसंघात महात्मा सोसायटी जवळील मिसींग लिंकचे काम पुर्ण झाले. त्यामुळे कोथरुड भागातील वाहन चालकांना महामार्गावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग मिळाला आहे. आता एकलव्य कॉलेजजवळील मार्गही उपलब्ध होणार आहे. तसेच सुतारवाडी येेथेही एक मिसींग लिंकचे काम सुरु होणार आहे. त्या कामाची निविदा प्रक्रीया लवकरच काढली जाणार आहे. ही मिसींग लिंक देखील कोथरुड मतदारसंघातील आहे. तसेच कर्वेरस्ता ते पौड रस्ता यांना जोडणारी एक छोटी मिसिंग लिंकचे काम पुर्ण झाले असुन, तो रस्ता दुचाकीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे.
इतर आमदार नापास?
पुणे शहरात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट ) एक आमदार आहे. सत्ताधारी पक्षाचे सात आमदार असुनही केवळ कोथरुड मतदारसंघातील मिसींग लिंकच्या कामाला प्राधान्य दिले गेले आहे. कोथरुड मतदारसंघाचे आमदार पाटील यांनी या मिसींग लिंकच्या कामासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचप्रकारे इतर आमदारांकडून मिसींग लिंकच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नाही. यामुळे आमदारांकडूनच ही कामे मार्गी लावली जातील असे अपेक्षित होते. त्यांच्याकडून सातत्याने आढावा बैठकही घेतली जाते परंतु कामे मार्गी लावण्यात ते अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन आमदारांत मतभेद?
गंगाधाम चौकातील वाहतुक कोंडी हा गंभीर विषय आहे. या चौकातील वाहतूक पोलिसांनी एक महिनाभर पाहणी करून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात अहवाल महापालिकेला दिला आहे. या चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुल कसा असावा यावरून सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांमध्ये मतभेद असल्याने हे काम मार्गी लागत नाही, अशीही चर्चा आहे.
Related
Articles
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !