कवठे येमाई , (वार्ताहर) : दहिवडी ता.शिरुर येथील नानासाहेब कुलाळ हे घरात असताना दरवाजा आतून बंद असल्याने सायंकाळच्या सुमारास त्यांची मुलगी तनुजा वडिलांना आवाज देत असताना आतून काहीही प्रतिसाद येत नसल्याने शेजारील नागरिकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता नानासाहेब यांनी कापडी पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून दिसून आले. दरम्यान, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी नानासाहेब बापदेव कुलाळ (वय-४५ रा.दहिवडी ता.शिरुर) यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
Fans
Followers