E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
Wrutuja pandharpure
30 May 2025
पुणे
: वाहतुकीचे नियम न पाळणार्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रसिद्ध आणि नेहमीच वाहनांची वर्दळ असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीवर आधारित कॅमेर्यांद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलिस निरीक्षक (वाहतूक नियोजन) सुनील गवळी आदी या वेळी उपस्थित होते.
चुकीच्या ठिकाणी वाहन लावल्यास, त्यांचे वाहन आणि क्रमांक ’एआय’ कॅमेर्यांद्वारे टिपले जाणार आहे. तसेच, एक मिनिटात वाहन न हलवल्यास थेट दंड आकारला जाणार आहे. तसेच, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, दुहेरी पार्किंग आणि रस्त्यावर अधिक वेळ वाहन उभे करणे आदी गोष्टींवरही एआयद्वारे कारवाई केली जाणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते, याचे मुख्य कारण म्हणजे बेशिस्तपणे होणारे वाहनाचे पार्किंग. रस्त्याच्या कडेने एकाहून अधिक रांगा लावून वाहने पार्क केल्याने रस्त्यावरून जाणार्या वाहनांना त्याचा अडथळा ठरतो.
महापालिका आयुक्तांसह विधी विभागाने अनेक वेळा वाहनचालक किंवा त्यांच्या चालकांकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात. आता एआय प्रणालीमुळे चालकाचे वाहन, क्रमांक व नियमभंग याचे छायाचित्र लगेच टिपले जाईल. वाहनचालकाला सूचना देऊनही त्याने वाहन हलवले नाही, तर ऑनलाइन दंड बजावला जाणार आहे. काही वाहनचालक आपले वाहन रस्त्यावर उभे करून कार्यालये किंवा खाद्यपदार्थ विकणार्या ठिकाणी जातात. काही प्रकरणात चालक वाहनातच बसून राहतात व पोलिसांनी हटवण्यास सांगितल्यास वाद घालतात. या नव्या यंत्रणेमुळे अशा घटनांमध्ये घट होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विमानतळाबाहेरील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तेथील रस्त्यावर केल्या जाणार्या बेशिस्त पार्किंगला चाप लावणे गरजेचे आहे. त्यामुळे, या रस्त्यावरदेखील लवकरच ’एआय’ आधारित कारवाईची यंत्रणा उभी केली जाणार आहे. पोलिस आयुक्तांनी विमानतळ प्रशासनाला त्याबाबत विनंती केली असून, त्यांच्याकडून ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामध्ये ओव्हरहेड गँट्रीच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांना सूचित करून कारवाई केली जाणार आहे.
’एआय’च्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालवणार्यांवर कारवाई करण्याची योजना ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शहरातील इतर गर्दीच्या रस्त्यांवरदेखील येत्या काळात ही यंत्रणा राबवण्याचा विचार आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून, सार्वजनिक रस्त्यांचा सुसज्ज वापर करावा. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता हे रस्ते आदर्श रस्ता करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त
अशी कार्यान्वित होणार यंत्रणा
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गोपाळकृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ’एआय’ आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल स्क्रीन बसवले जातील. हे कॅमेरे बेकायदा व चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणार्या वाहनांची ओळख करून त्यांचा क्रमांक स्क्रीनवर दाखवतील. वाहनचालकाला वाहन हटवण्यासाठी एक मिनिटाचा अवधी दिला जाईल. जर वाहन हलवले गेले नाही, तर थेट ऑनलाइन चलन संबंधितांवर केले जाईल.
पोलिसांनी या रस्त्याच्या संपूर्ण पट्ट्याचा अभ्यास करून सहा ठिकाणी अनधिकृत पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. या प्रणालीचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे आणि पोलिसांशी होणारे वाद टाळणे हा आहे.
Related
Articles
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
6
ठेवींवरील व्याज घटणार